*कोंकण एक्सप्रेस*
*शिरगाव हायस्कूलच्या वसतिगृहासाठी वॉटर फिल्टरचा भेट समारंभ*
*शिरगाव | संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने श्री अमित साटम (मुंबई कार्यकारिणी सदस्य) यांनी वॉटर फिल्टरची भेट दिली. हा भेट समारंभ रविवार, दिनांक २३ मार्च २०२५ रोजी शिरगाव हायस्कूलच्या कार्यालयात पार पडला.
या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष पी. व्ही. साटम साहेब यांनी वॉटर फिल्टर स्वीकारला. यावेळी राजन चव्हाण, संस्था उपाध्यक्ष संभाजी साटम, विजय जाधव, संस्था कार्यकारिणी सदस्य हेमंत देसाई, राजेंद्र शेट्ये, मानद अधीक्षक संदीप साटम, शिरगाव शाळा समिती चेअरमन विजयकुमार कदम , कुवळे शाळा समिती चेअरमन विजय तावडे, आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, संस्थेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळणार आहे. संस्थेच्या वतीने अमित साटम यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.