*कोंकण एक्सप्रेस*
*लायन्स इंटरनॅशनल लायन्स क्लब ऑफ पुणे, आकुर्डी यांच्या माध्यमातून कनेडी प्रशालेतील २१ विद्यार्थीनींना सायकल प्रदान*
*कणकवली ः प्रतिनिधी*
लायन्स इंटरनॅशनल लायन्स क्लब ऑफ पुणे, आकुर्डी यांच्या माध्यमातून माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेतील २१ विद्यार्थीनींना मोफत सायकल प्रदान करण्यात आल्या. आपल माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या सायकल इतर गरजू विद्यार्थीनींना द्याव्यात असा लायन्स क्लब चा उद्येश आहे.
या शुभ प्रसंगी लायन्स क्लब ऑफ पुणे आकुर्डी चे अध्यक्ष श्री.बाबुराव सागावकर यांनी संस्थेच्या एकूणच प्रगतीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांशी हितगुज करताना सागावकर म्हणाले की विदयार्थ्यांना शिक्षकांची आदरयुक्त भीती असावी असे प्रतिपादन केले.
या शुभ प्रसंगी लायन्स क्लब ऑफ पुणे, आकुर्डी चे अध्यक्ष सन्मा. बाबुराव सागावकर, खजिनदार लायन्स, सन्मा. श्री. निलेश चोपडे, डोनर सन्मा. श्री. शिवाजी वाघ, सन्मा. श्री. शामराव धोत्रे, चिपळूण येथील उद्योजक सन्मा.श्री.संजय साळवी, त्यांच्या माध्यमातून या सायकल प्रशालेला मिळाल्या ते भिरवंडे गावचे सुपुत्र इंटरनॅशनल बिझनेस कोच सन्मा. श्री. विनय सावंत, त्यांच्या प्रयत्नातून या सायकल मिळाल्या ते संस्थेचे सरचिटणीस सन्मा. श्री. शिवाजी सावंत, कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री. सतीश सावंत, संचालक व्ही.बी. सावंत, शालेय समितीचे चेअरमन आर. एच.सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.