*कोंकण एक्सप्रेस*
*सेवा निवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्गचा स्नेह मेळावा २३ मार्च रोजी ओरोस येथे….!*
*शिरगाव | संतोष साळसकर*
सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाची स्थापना होऊन शासन दरबारी अधिकृत नोंदणी झाल्यानंतर महासंघाची व्याप्ती वाढविणे व सदस्य संख्या वाढवून संभासदांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे या उद्देशाने काही जेष्ठ सभासदांच्या संकल्पनेतून संवर्गाचा स्नेह मेळावा आयोजित करावा अशा सुचना आल्यामुळे संवर्गाचा ‘प्रथम वर्ष स्नेह मेळावा’ रविवार दिनांक २३/०३/२०२५ रोजी सकाळी ठिक १०.३० ते ४.३० या वेळेत ग्रामसेवक भवन ओरोस येथे आयोजित करण्यात आला आहे. हा स्नेहमेळावा प्रकाश बाळकृष्ण राणे (अध्यक्ष सेवानिवृत्त ग्रामसेवक सवंर्ग महासंघ) यांचे अध्यक्षते खाली संपन्न होणार असून चंद्रकांत भगवान अणावकर- सल्लागार, सुरेश यशवंत पेडणेकर-
सेवानिवृत्त पेन्शर्नस असो उपाध्यक्ष सिंधुदुर्ग, आर. जी. सावंत, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी सुदेश लक्ष्मण कोरगांवकर, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी, शंकरराव चव्हाण, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दिप प्रज्वलन मान्यवर, पाहुण्यांचे स्वागत, ७५ वर्षावरील जेष्ठ सभासदांचा सत्कार, सेवानिवृत्तीनंतर समाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या सभासदांचा सत्कार, पाहुण्यांचा सत्कार, पाहुण्यांचे मनोगत, अध्यक्षीय भाषण, समारोप असे कार्यक्रमाचे स्वरूप असून प्रास्ताविक हनुमंत गणेश प्रभू, (उपाध्यक्ष सेवानिवृत्त ग्रामसेवक सवंर्ग महासंघ) करणार आहेत. तरी जिल्ह्यातील सेवानिवृत्त ग्रामसेवक यांनी उपस्थित राहून स्नेह मेळावा यशस्वी करावा असे आवाहन सेवा निवृत्त ग्रामसेवक संवर्ग सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.