*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हाधिकारी श्री .अनिल पाटील व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. विजय काळे यांच्या उपस्थितीत कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ व रिक्षा चालक-मालक सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्या सोबत रिक्षा चालकांच्या समस्या बद्दल संयुक्तिक बैठक संपन्न*
कणकवली ः प्रतिनिधी*
आज दिनांक 21 मार्च 2025 रोजी सिंधुदुर्ग नगरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे माननीय जिल्हाधिकारी श्री .अनिल पाटील साहेब तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय श्री. विजय काळे साहेब यांच्या उपस्थितीत कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ व रिक्षा चालक-मालक सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्या सोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालकांच्या समस्या बद्दल संयुक्तिक बैठक झाली.
या बैठकीमध्ये टेरीफ (भाडे वाढ) या विषयावर जास्त चर्चा झाली. त्यावेळी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक व सहसचिव सुधीर पराडकर यांनी पहिल्या स्टेजला 1.6 किलोमीटरला 50 ₹ व त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला 20 ₹अशी भाडेवाढ मिळावी. अशी मागणी केली. त्या मागणीला कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या सर्व पदाधिकारी तसेच रिक्षा चालक-मालक सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी एक मुखी पाठिंबा दर्शविला. या भाडेवाडीवर जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी विचार करून मागवून निर्णय देण्यात येईल असे आश्वासित केले आहे.
आजच्या बैठकीला कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कोकण विभागीय कार्याध्यक्ष संतोष नाईक, सहसचिव सुधीर पराडकर, मालवण तालुकाध्यक्ष संदीप सावंत, मालवण तालुका उपाध्यक्ष सुनील पाताडे, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष एकनाथ राऊळ, कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश सावंत, बांदा शहराध्यक्ष राजेश बांदेकर, कुडाळ तालुका अध्यक्ष रवी माने. तसेच रिक्षा चालक-मालक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नागेश ओरसकर सचिव कांबळी उपस्थित होते.