*कोकण Express*
*अभिनंदन ठरावावरुन भाजपच्या रणजीत देसाई व शिवसेनेच्या संजय पडते यांच्यात जोरदार खडाजंगी*
*खडाजंगीमुळे संजय पडते यांचा बीपी झाला हाय!*
*राजकीयवाद बाजूला ठेवून विरोधी गटाचे रणजित देसाई आणि राजेंद्र म्हापसेकर धावले मदतीला*
*सिंधूदुर्ग ः प्रतिनिधी*
राजकारण करण्याला मर्यादा आहे. ते शाब्दिक व विकास प्रक्रियेपुरते मर्यादित असावे, अशी राजकीय व्याख्या आहे. याचा प्रत्यय गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत दिसून आले. अभिनंदन ठरावावरुन सभेत भाजपच्या रणजीत देसाई व शिवसेनेच्या संजय पडते यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हा वाद एवढा विकोपाला गेला की यात संजय पडते यांचा बीपी हाय झाल्याने त्यांची तब्बेत खालावली. मात्र, हे समजताच रणजीत देसाई ताडकन सभागृहा बाहेर पडत पहिले मदतीला धावले. त्यानंतर अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्यासह सर्वांनीच धाव घेत ‘राजकारण मर्यादित असून प्रसंगाला आम्ही सर्व एक आहोत’ हे दाखवून दिले.
गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत पालकमंत्री उदय सामंत यांचा अभिनंदन ठराव घेण्यावरुन सत्ताधारी रणजीत देसाई व विरोधक संजय पडते यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अभिनंदन ठरावाचा वाद एवढा लांबला की, सभा अभिनंदन ठरावाच्या पुढे गेलीच नाही. यावेळी देसाई व पडते एकमेकां समोर आक्रमक होत भांडत होते. याच दरम्यान, पडते यांचा बीपी हाय झाला. यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते अचानक सभागृहा बाहेर पडले. ही बाब रणजीत देसाई यांच्या लक्षात येताच ते पाठोपाठ बाहेर आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील यांच्या दालनात त्यांना बसविले. ताबडतोप जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे यांना बोलावून घेतले. यामुळे पूर्ण सभागृहात शांतता पसरली होती.
त्यानंतर भाजपच्या संजना सावंत, विष्णुदास कुबल यानी सभागृह सोडत पडते यांच्याजवळ गेले. थोड्या वेळाने सेनेचे अमरसेन सावंत व नंतर अध्यक्ष म्हापसेकर, सचिव पराडकर तेथे पोहोचले. डॉ खलिपे यानी बीपी वाढला असल्याचे सांगितल्याने पडते यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात याच सदस्यांनी नेले. तेथे त्यांचा ईसीजी काढून सलाइन लावण्यात आले. रणजीत देसाई व संजय पडते यांचे स्थायी, जिल्हा परिषद सर्व साधारण सभेत वारंवार वाद होत असतात. राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतात. तरीही संकट समयी माणुस म्हणून देसाई यांच्यासह सर्व सदस्यांनी दाखविलेली माणुसकी आजच्या राजकीय वैरा बाहेरिल होती, एवढे नक्की.