*कोंकण एक्सप्रेस*
*हत्ती अभ्यास दौऱ्यासाठी दोडामार्ग मधून वन विभाग व सरपंच यांची टीम रवाना*
*कर्नाटकातील बेंगलोर येथे होतोय अभ्यास दौरा*
प्रतिनिधी :शुभम गवस
दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे, मुळस, सोनावल, मेढे, पाळये, तिराळी आदी पंचक्रोशीत हत्ती संकट असून हत्ती पकड मोहीम राबवावी यासाठी आंदोलने झाल्यानंतर हत्ती पकड मोहीमेसाठी शासन विचाराधीन आहे, यासाठी हत्ती अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून आज दोडामार्ग वनक्षेत्रपाल वैशाली मंडल यांच्या नेतृत्वाखाली या पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामस्थ व वनविभागाची टीम बेंगलोर येथे रवाना झाली.