*कोंकण एक्सप्रेस*
*देवगडमध्ये रंगले मराठी गझल संमेलन*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
गझल मंथन साहित्य संस्थेच्यावतीने मराठी अभिजात भाषेच्या सन्मानार्थ जामसंडे सातपायरी येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय मराठी गझल संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गझलकार दत्तप्रसाद जोग यांच्याहस्ते करण्यात आले.तर या संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध गझलकार डॉ. राज रणधीर यांनी भूषविले. हे संमेलन तीन सत्रात घेण्यात आले. यावेळी पाच गझल मुशायरांचे सादरीकरण केले. यावेळी संजय कुळये, पौर्णिमा पवार, डॉ. यशवंत मस्के यांना गझलयात्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी संमेलनाच्या स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध गझलकार डॉ. माधुरी चव्हाण- जोशी, प्रमुख पाहुणे म्हणून राधा भावे, डॉ. स्नेहल कुलकर्णी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात नानिवडेकरांची गझल या विषयावर चर्चासत्र पार पडले. यात दत्तप्रसाद जोग आणि डॉ. माधुरी चव्हाण जोशी हे वक्ते सहभागी झाले होते. यात संवादक म्हणून डॉ. स्नेहल कुलकर्णी या सहभागी झाल्या होत्या.
प्रसिद्ध गझलकार राधा भावे यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा क्र. १ चे सादरीकरण झाले. त्यात सूत्रसंचालन गिरीश जोशी यांनी केले. त्यात गिरीश जोशी यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा गझल मधून मांडताना ते म्हणाले,
शेत गारांमुळे विधुर झाले, दृश्य शेतात पांढरे होते
पान, फुले, फळे नव्हती, फक्त झाडांस काजवे होते
शेर नव्हते गझलमध्ये माझ्या, वेदनांचीच आसवे होते
अशा व्यथा मांडल्या. यात डॉ. राज रणधीर, डॉ. दत्तप्रसाद जोग, डॉ. स्नेहल कुलकर्णी, डॉ. माधुरी चव्हाण- जोशी, मयुर भावे, उत्तरा जोशी, दिवाकर जोशी, विजयानंद जोशी, प्रा. डॉ. अविनाश कासंडे, डॉ. यशवंत मस्के हे कलाकार सहभागी झाले होते. यांनी आपल्या शेर, गझल सादर केल्या. आत्तम गेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा क्र. २ चे सादरीकरण झाले. सूत्रसंचालन आत्माराम जाधव यांनी केले. तिसऱ्या सत्रात कैलास गांधी यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा क्र. ३ चे सादरीकरण झाले. याचे सूत्रसंचालन मीना शिंदे यांनी केले.. यात ज्योत्स्ना चांदगुडे, अपर्णा पुराणिक, शीला टाकळकर, रेखा येळंबकर, डॉ. अविनाश पाटील, राहुल कदम, सय्यद चांद तिरोडकर, डॉ. शुभा लोंढे, डॉ. मनोज वराडे, विशाखा पाटोळे हे कलाकार सहभागी झाले होते. प्रदीप तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा क्र. ४ चे सादरीकरण झाले. याचे सूत्रसंचालन माधुरी खांडेकर यांनी केले. यात ज्योती पाटील, प्रतिभा विभुते, डॉ. तेजस्विनी कदम, क्रांती वेंदे, किरण बरडे, डॉ. तरुजा भोसले, संजय तांबे, रेखा हिरेमठ हे कलाकार सहभागी झाले होते.
केदार पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा क्र. ५ चे सादरीकरण झाले. याचे सूत्रसंचालन मुग्धा कुळये यांनी केले. यात सुनेत्रा जोशी, उमा जोशी, संजना जुवाटकर, संजय तांबे, अशरफ मुक्री, आशिष सावंत, शुभम कदम, संजय कुळये, सरिता गोखले हे कलाकार सहभागी झाले होते. गझल मंथन साहित्य संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा डॉ. तरुजा भोसले यांनी संमेलनाचे उत्तम नियोजन केले होते.