*कोंकण एक्सप्रेस*
*गुढीपाडव्यानिमित्त तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धेचे आयोजन*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
गुढीपाडवा व हिदू नववर्ष स्वागताच्या निमित्ताने हिदूधर्माभिमानी, वेंगुर्लातर्फे वेंगुर्ला तालुका मर्यादित शालेय विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा रविवार दि. ३० मार्च रोजी दुपारी ३ वा. रामेश्वर मंदिर, वेंगुर्ला येथे संपन्न होणार आहे.
इयत्ता पहिली ते पाचवीसाठी ‘ऐतिहासिक व संत परंपरा‘ हा विषय ठेवण्यात आला असून प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ७००, ५००, ३०० आणि उत्तेजनार्थ २००ची दोन बक्षिसे तसेच चषक व प्रमाणपत्र देण्यात येतील. तर सहावी ते दहावीसाठी ‘रामायण व महाभारतामधील व्यक्तिरेखा‘ हा विषय ठेवण्यात आला असून यातील प्रथम विजेत्यांना अनुक्रमे १०००, ७००, ५०० आणि उत्तेजनार्थ ३००ची दोन बक्षिसे तसेच चषक व प्रमाणपत्र देण्यात येतील. स्पर्धकांनी आपली नोंदणी २८ मार्चपर्यंत विनीत परब (८९५६७९४८५३) किवा प्रा.सचिन परूळकर (९४२१२३८०५३) यांच्याकडे करावी. दोन्ही गटांसाठी सादरीकरणासाठी २ मिनिटे कालावधीत ठेवला असून स्पर्धकांनी येताना शाळेचे ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. मोठ्या गटातील स्पर्धकांनी दुपारी ठिक २.५० वा. तर लहान गटातील स्पर्धकांनी दुपारी ठिक ०३.३० वा. स्पर्धेसाठी रामेश्वर मंदिर, वेंगुर्ला येथे उपस्थित रहावे. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्राने गौरविण्यात येईल. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे