*कोंकण एक्सप्रेस*
*पडेल येथे जागतिक महिला दिन संपन्न*
*महिलांचा सन्मान हा फक्त महिला दिना दिवशी न राहता कायम राखला पहिजे- सरपंच भुषण पोकळे*
*देवगड : प्रथमेश वाडेकर*
समाज हा परिवर्तनशिल असतो आपण महिलांविषयी आपले विचार आणि दृष्टीकोन बदलला तर स्त्री पुरुष असा भेदभाव राहणार नाही. महिलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्तुत्ववान भरारी हि गावाबरोबरच देशाला यश मिळवून देणारी आहे. महिलांचा सन्मान हा महिला दिना दिवशी न राहता कायम त्यांचा आदर राखला पाहिजे. असे मत पडेल गावचे सरपंच भुषण पोकळे यांनी व्यक्त केले.
पडेल ग्रामपंचायतीच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सरपंच विकास दिक्षित, पडेल मंडळाचे भाजपा अध्यक्ष बंडया नारकर, उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, अंकुश टुकरुल, वैभव वारीक, संजय मुळम, पडेल मुख्याध्यापक हिराचंद तानावडे, डॉ.आरोहि दिक्षित, डॉ.पुजा मालपेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा,खो-खो स्पर्धा,रांगोळी स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांनीदेखील मोठया प्रमाणात उपस्थिती दर्शविली.