जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत वेत्ये कलेश्वर पूर्वी देवी प्रासादिक मंडळ प्रथम

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत वेत्ये कलेश्वर पूर्वी देवी प्रासादिक मंडळ प्रथम

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत वेत्ये कलेश्वर पूर्वी देवी प्रासादिक मंडळ प्रथम*

*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*

खानोली-सुरंगपाणी येथील विठ्ठल पंचायतन देवस्थान येथे आमलकी एकादशीनिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत सावंतवाडी-वेत्ये येथील कलेश्वर पूर्वी देवी प्रासादिक भजन मंडळाने पथम क्रमांक पटकाविला.

विठ्ठल पंचायतन देवस्थान, सुरंगपाणी आणि स्वरसंगीत प्रासादिक भजन मंडळ, हरिचरणगिरी-कोंडुरा यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल मंदिरात या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन वायंगणी सरपंच दत्ताराम उर्फ अवि दुतोंडकर यांच्या हस्ते झाले. सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे, कीर्तनकार अवधूत नाईक, उपसरपंच रवींद्र धोंड, ग्रामपंचायत सदस्या राखी धोंड, संध्या गोवेकर, महेश मुणनकर, खानोली सहकारी संस्थेचे चेअरमन प्रशांत खानोलकर, कुडाळकर उपस्थित होते. परीक्षक म्हणून आनंद मोर्ये व योगेश प्रभू यांनी काम पाहिले.

स्पर्धेत प्रथम-कलेश्वर पूर्वी देवी भजन मंडळ (वेत्ये), द्वितीय- विठ्ठल-रखुमाई भजन मंडळ (आंदुर्ले), तृतीय- चिंतामणी भजन मंडळ (सुरंगपाणी.) त्यांना अनुक्रमे ५ हजार, ४ हजार, ३ हजार रुपये आणि प्रत्येकी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ जैन महालक्ष्मी भजन मंडळ (कुडाळ-वालावल) व देवी सातेरी भजन मंडळ (मातोंड) यांना प्रत्येकी १ हजार रू., प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. उत्कृष्ट गायक-अनिकेत भगत (चिंतामणी मंडळ, सुरंगपाणी), हार्मोनियम वादक-शांताराम मुणनकर (दत्तकृपा मंडळ, वायंगणी), पखवाज वादक-सागर वारखंडकर (कलेश्वर पूर्वी देवी मंडळ वेत्ये), तबलावादक-भार्गव गावडे (जैन महालक्ष्मी मंडळ वालावल), झांजवादक-अक्षय वालावलकर (विठ्ठल-रखुमाई मंडळ,आंदुर्ले), कोरस-जनता सेवा मंडळ (परबवाडा-वेंगुर्ले) यांची निवड करण्यात आली.

स्पर्धा यशस्वीतेसाठी विठ्ठल पंचायतन देवस्थान आणि स्वरसंगीत प्रासादिक भजन मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन अनिल भगत यांनी केले. या भजन स्पर्धेस रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

फोटोओळी-सुरंगपाणी येथील जिल्हा भजन स्पर्धेतील विजेत्या कलेश्वर पूर्वी मंडळास परीक्षक आनंद मोर्ये व योगेश प्रभू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!