*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्या वैभववाडी तालुका अध्यक्षपदी राजेश पडवळ फेर निवड करण्यात आली तर सचिवपदी मंदार चोरगे, खजिनदार पदी गुरुनाथ गुरव यांची बिनविरोध निवड*
*वैभववाडी : संजय शेळके*
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्या वैभववाडी तालुका अध्यक्षपदी राजेश पडवळ फेर निवड करण्यात आली तर सचिवपदी मंदार चोरगे, खजिनदार पदी गुरुनाथ गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
संस्थे संस्थापक तथा जिल्हध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे तालुका सल्लागार तथा जेष्ठ सदस्य डॉ.राजेंद्र पाताडे, मंगेश चव्हाण, रुपेश वारंग, प्रशांत ढवण आदी महत्वाचे सदस्य उपस्थित होते.
सन २०२५ ते २०२६ अशी दोन वर्षासाठी वैभववाडी तालुका कार्यकारणी निवडण्यात आली. अध्यक्ष राजेश मोतीराम पडवळ, उपाध्यक्ष शेखर शंकर रावराणे, अनुराधा शिवाजी कदम, सचिव मंदार सदाशिव चोरगे सहसचिव मारुती धोंडीराम कांबळे,
खजिनदार गुरुनाथ पांडुरंग गुरव, सह खजिनदार विजय बळीराम कोकरे, तर सदस्य -म्हणून रविंद्र बाळकृष्ण रावराणे, किशोर बळीराम दळवी, ब्रह्मा आत्माराम हरयाण,
दत्ताराम सिताराम सावंत, कादीर आब्बास फरास,उकार भालचंद्र साठे, रुपेश बापू कांबळे,विजय पांडुरंग गुरव,महेश दत्ताराम संसारे, संजय शिवाजी रावराणे अशी निवड करण्यात आली आहे. सर्व कार्यकारणी व सदस्यांचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी अभिनंदन केले.