*कोंकण एक्सप्रेस*
*देवबाग समुद्रकिनारी १५८ कोटींच्या विकास कामांना अर्थसंकल्पात मान्यता*
*मालवण : प्रतिनिधी*
महाराष्ट्र शासन पर्यावरण पूरक आणि संरक्षण व व्यवस्थापन या ४५० कोटी रुपये प्रकल्पांतर्गत देवबाग येथे १५८ कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली आहे. याबाबत आमदार निलेश राणे यांनी राज्य शासनाकडे केलेल्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गतिमान विकास सुरूच राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२५-२६ सादर केला. खरोखरच हा अर्थसंकल्प महाराष्ट्रातील प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक घटकासाठी, प्रशासनाच्या सर्व क्षेत्रांसाठीचे अर्थसंकल्प आहे.
महाराष्ट्र पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन विभागाच्या मार्फत ४५० कोटी रुपयांपैकी माझ्या मतदारसंघातील मालवण तालुक्यातील, देवबाग समुद्र किनाऱ्यासाठी १५८ कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे समुद्रकिनारी वात्सव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होईल. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार तसेच महायुती सरकारचा मन:पूर्वक आभारी आहे. अशी प्रतिक्रिया आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.