*माय माऊली सबलीकरण संस्थेमार्फत महिला दिन साजरा*

*माय माऊली सबलीकरण संस्थेमार्फत महिला दिन साजरा*

*कोंकण एक्सप्रेस*

*माय माऊली सबलीकरण संस्थेमार्फत महिला दिन साजरा*

*मालवण (प्रतिनिधी)*

मालवण मधील माय माऊली सबलीकरण संस्थेमार्फत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गृहिणी असून सुद्धा ज्यांनी अनन्यसाधारण कर्तृत्वाने आपले जीवन घडवले, अशा गृहिणींचा सत्कार व सन्मान संस्थेतर्फे करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहूण्या म्हणून सिंधुदुर्गातील प्रथम महिला बिल्डर गौतमी गोपाळ महाडळकर तर अध्यक्षपदी सौ. पुनम नागेश चव्हाण उपस्थित होत्या. याप्रसंगी माय माऊली सबलीकरण संस्थेच्या संस्थापिका सौ. फेनी फर्नांडिस यांनी प्रास्ताविक केले. आपल्या चारही मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांना समाजकार्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या श्रीमती जॅकिन डीमेलो, अतिशय कठीण परिस्थितीतही आपल्या पाचही मुलांना उत्तम शिक्षण देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण करणाऱ्या वायरी येथील श्रीमती सुभद्रा सखाराम सातार्डेकर, अनेक महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या वायरी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. साक्षी भगवान लुडबे, मत्स्य व्यवसाय करून आपल्या गरीब कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या श्रीमती लक्ष्मी जामसंडेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेमार्फत अनेक महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले होते. आनंदव्हाळ येथील श्री. सामंत यांनी बचत गटासाठी वैयक्तिक आणि महिला बचत गटासाठी विविध सरकारी योजनाची व कर्ज प्रकरणाबद्दल माहिती दिली. तसेच यावेळी संस्थेचा प्रथम वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी सौ. म्हारदळकर यांनी तसेच सौ पूनम चव्हाण यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे संचालक मंडळातील सौ मनीषा गावकर, सौ. श्रमिका लुडबे, सौ. नीलिमा रावले, सौ. मिताली मोंडकर, भारती वाईरकर, सौ. गौरी विनोद सातार्डेकर, मातृत्व आधार फाउंडेशनचे सर्वेसर्वा संतोष लुडबे व दादा वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गौरी सातार्डेकर यांनी केले. आभार प्रदर्शन सौ.मिताली मोंडकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!