*कोंकण एक्सप्रेस*
*देवगड येथे १९ मार्च पासून ऑल इंडिया ओपन डे-नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा*
*प्रथम क्रमांकाला ३ लाख ५० हजाराचे बक्षिस ना. नीतेश राणे यांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
यंग स्टार क्रिकेट क्लब देवगड प्रीमियर लीग आयोजित आमदार चषक ऑल इंडिया ओपन डे नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा मत्स्य आणि बंदर विकास मंत्री (महाराष्ट्र राज्य) व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या सहकार्याने १९ मार्च ते २३ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
या लीग स्पर्धेत १६ संघाना सहभाग देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ३ लाख ५० हजार द्वितीय क्रमांक १ लाख ५० हजार या व्यतिरिक्त वैयक्तिक वैशिष्ट्ये उत्कृष्ट फलंदाज , उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर मोटरसायकल देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी रुपये ४० हजार असून नाव नोंदणीची अंतिम तारीख ६ मार्च २०२५ आहे.
या स्पर्धा यंग स्टार प्रॅक्टिस ग्राउंड शेठ मग हायस्कूल देवगड या ठिकाणी होणार असून अधिक माहिती करता संदीप रुमडे ९४०४१५०५०५ योगेश पारकर ८३०८०७५६६६ संतोष तारी ९१७५११०२०२ निरज गाडी ९४२१२६४४८३ यांच्याशी संपर्क साधावा.