*कोंकण एक्सप्रेस*
*हत्ती पकड मोहीम उपोषणा दरम्यान अध्यक्ष प्रवीण गवस यांची प्रकृती खालावली*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
हत्ती पकड मोहीम राबवावी यासाठी काल पासून सरपंच सेवा संघटनेचे उपोषण सुरु आहे, मात्र वन विभागाचे जबाबदार अधिकारी याची दखल घेत नाहीत, तसेच आज सरपंच सेवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण गवस यांची उपोषणा दरम्यान प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काल पासून हत्ती पकड मोहिमेसाठी प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे मात्र वनविभागाचे जबाबदार अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे शासन करताय तरी काय? असा प्रश्न उपोषणकर्त्यांकडून करण्यात येत आहे. तसेच या उपोषणाला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच सदस्य, शेतकरी तसेच सर्व पक्षांच्या राजकीय पुढाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. मात्र आज मुख्य उपोषणकर्ते प्रवीण गवस व समीर देसाई यांची तब्येत बिघडल्यामुळे सरपंच संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
एक तर माझ्या जीवाचा नाही तर शेतकऱ्यांच्या अतित्वाचा निर्णय लागेल असे प्रवीण गवस यांनी सांगितले आहे.