*कोंकण एक्सप्रेस*
*जागतिक महिला दिन व करूळ गावचे सुपुत्र माजी आमदार ए. पी. सावंत यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर संपन्न*
*वैभववाडी ः संजय शेळके*
जागतिक महिला दिन व करूळ गावचे सुपुत्र माजी आमदार ए. पी. सावंत यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत करुळ व राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल सांगुळवाडी यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिरात एकूण 85 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे संचालक संदीप पाटील, करुळ सरपंच नरेंद्र कोलते, जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, पं. स. माजी सदस्य बाळा कदम, उपसरपंच सचिन कोलते, रवींद्र पवार, माधवी राऊत, विवेक कदम, तंटामुक्ती अध्यक्ष संजय कदम, हेमंत पाटील, महेश कदम, प्रकाश सावंत, ग्रामसेवक शशिकांत गुरव आदी उपस्थित होते. डॉ. राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल सांगुळवाडीचे डॉ. ऋतुजा म्हसे – आचरेकर, डॉ. अनिरुद्ध मुद्राले, डॉ. प्राची जाधव, डॉ. पूनम मर्गज यांनी रुग्णांची तपासणी केली. हॉस्पिटलच्या वतीने रुग्णांना मोफत औषध पुरवठा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने पार पडलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव यांनी मानले.