तिलारी धरणालगत शिरंगे हद्दीत काळ्या दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनना विरोधात- खानयाळे ग्रामस्थांनी गुरुवारपासून साखळी उपोषणास सुरुवात

तिलारी धरणालगत शिरंगे हद्दीत काळ्या दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनना विरोधात- खानयाळे ग्रामस्थांनी गुरुवारपासून साखळी उपोषणास सुरुवात

कोंकण एक्सप्रेस

तिलारी धरणालगत शिरंगे हद्दीत काळ्या दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनना विरोधात 

खानयाळे ग्रामस्थांनी गुरुवारपासून साखळी उपोषणास सुरुवात

दोडामार्ग /शुभम गवस

थेट तिलारी धरणालगत शिरंगे हद्दीत काळ्या दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून सुरू असलेले उत्खनन तिलारी धरणाच्या पाणी साठ्याच्या लगत असलेल्या खानयाळे गावाच्या नैसर्गिक संरक्षक भिंत म्हणजेच डोंगराला मोठी हानी पोहचली असून येत्या पावसाळ्यात हा डोंगर पूर्णपणे खचला जाऊन येथून धरण फुटू शकते व मोठी दुर्घटना घडू शकते हे लक्षात घेऊन या खाणींच्या विरोधात सुरू असलेल्या क्वॉरीलगत खानयाळे ग्रामस्थांनी गुरुवारपासून साखळी उपोषणास सुरुवात केली.जोपर्यंत महसूल प्रशासनाकडून सुरू असलेल्या क्वॉरी कायमस्वरूपी बंद करण्यात येतील असे लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे तसेच या सर्वाला जबाबदार असलेले महसूल प्रशासन, तिलारी धरण प्रकल्प अधिकारी आणि क्वॉरी चालक मालक यांच्या बद्दल तीव्र संताप व्यक्त केला.आज शुक्रवारीही असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थिती त उपोषण सुरूच आहे.

गुरुवारी सायंकाळी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर, महसूल नायब तहसीलदार वैशाली राजमाने, मंडळ अधिकारी राजन गवस उपोषणस्थळी दाखल झाले. यावेळी शिरंगे धरण परिसरातील खाणी बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठविल्याचे लक्ष्मण कसेकर यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले. यावेळी आपणास अहवाल नको तर खाणी तात्काळ बंद करा आणि जर तुमच्याकडे अधिकार नसतील तर जिल्हाधिकाऱ्यांना येथे बोलवा. तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील बोलवा असे उपोषणकर्त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे अधिकाऱ्यांना माघारी परतावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!