*कोकण Express*
*पोलीस प्रशासनाने मटका अड्ड्यावर दिखाऊ कारवाई न करता त्या गैरधंदेवाल्यांच्या मुळापर्यंत जावे*
*गुरुदास गवंडे;अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल,मनसेच्या माध्यमातून इशारा…*
पोलिस प्रशासनाने मटका अड्ड्यावर दिखाऊ कारवाई करू नये, तर त्या गैरधंदेवाल्यांच्या मुळापर्यंत जावे,अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केली आहे.दरम्यान सावंतवाडी प्रमाणे तालुक्यातील अन्य शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात मटका घेतला जात आहे.मात्र त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केला जातो,असा आरोप करत तात्काळ कार्यवाही न झाल्यास मनसेच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर उतरू,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.याबाबत श्री. गवंडे यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,सावंतवाडी तालुक्यात काल शहरातील काही मटका व्यावसायिकांवर गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली.परंतु सावंतवाडी तालुक्यांमध्ये अन्य शहरांमध्येही तसेच बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मटका घेतला जातो.त्यामुळे फक्त महिन्याला दाखवण्यापुरते कारवाई नको,तर कायमस्वरूपी कारवाई करा,सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणावर मटका चालतो परंतु जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केला जातो,आज युवा पिढी ची ओढ मटक्याकडे भरपूर लागलेली आहे.त्याच प्रमाणे ऑनलाइन मटका समजतो,अनेक बाजारपेठेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मटका चालतो,याबाबत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलिसांना वारंवार माहिती दिली आहे.मात्र महिन्याला कुठेतरी पाच सहा हजाराचा मुद्देमाल दाखवायचा आणि कारवाई करायची हे योग्य नाही.त्याच्यामुळे पोलिसांनी याची दखल घेतली नाही,तर या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल,आज युवा पिढी रोजगार नसल्यामुळे कोठेतरी मटका लागेल आणि आपलं भाग्य उजळेल या नादात मोठ्या प्रमाणात मटका खेळत आहेत.याची गंभीर दखल घेऊन संबंधितावर कारवाई करा,अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू,असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.