कोंकण एक्सप्रेस
माटणे येथे गॅस गळती, ग्रामस्थ आक्रमक..
दोडामार्ग : शुभम गवस
*दोडामार्ग, ०५: दोडामार्ग तालुक्यातील माटणे येथील सीएनजी स्टेशनला गॅस पुरवठा करणाऱ्या कुडचिरे गोवा ते माटणे या पाईपलाईनला आज सकाळी आयी माटणे येथील सीमेजवळ गॅस गळती पाहावयास मिळाली, यातून आग सदृश्य धूर बाहेर येत असल्यामुळे तेथील ग्रामस्थांची भंबेरी उडाली. त्यांनी लगेचच जवळील सीएनजी गॅस स्टेशनला याची कल्पना दिल्यानंतर थोड्या वेळाने सदरचा गॅस पुरवठा बंद करण्यात आला. तरीही या ठिकाणी कोणताही जबाबदार अधिकारी आला नसल्याने तसेच येथील प्रशासकीय यंत्रणा ही पूर्णतः झोपेत असल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांचा जीविताचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख बबलू पांगम तसेच आयी गावचे सरपंच विशाल नाईक, माटणे गावचे सरपंच महादेव गवस, शाखाप्रमुख सागर गवस यांसह अनेक ग्रामस्थ यांनी या ठिकाणी येऊन सदरच्या परिस्थितीची पाहणी केली, आमच्या जीवितास धोका निर्माण करणारी ही गॅस पाईपलाईन कायम स्वरूपी बंद करा अशी मागणी करत प्रशासनाचा व या महाराष्ट्र नेचरलं गॅस लिमिटेड च्या व्यवस्थापनाचा निषेध केला. व या ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारू असे म्हटले. मात्र सदर त्या ठिकाणी गॅस स्टेशनवर काम करणारे कर्मचारी वगळता कोणताही जबाबदार अधिकारी येवू न शकल्यामुळे उपस्थित आक्रमक झाले. या ठिकाणी गॅस स्टेशनवरच्या तांत्रिकी टीमने सदरची पाहणी केली असता गॅस पाईपलाईनमध्ये गळती होतं असल्याचे ते म्हणाले .