*कोंकण एक्सप्रेस*
*जि.प.आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं-१चे वार्षिक स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांने संपन्न*
*कासार्डे प्रतिनिधी ;संजय भोसले.*
कणकवली तालुक्यातील पीएमश्री जि. प. आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं १ या प्रशालेचे “वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण विविध उपक्रमाने व गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाने संपन्न झाले.
बक्षिस वितरण कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व विद्येची देवता सरस्वती, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.
त्यानंतर प्रशालेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत आणि सत्कार करण्यात आले.दरम्यान सकाळ सत्रात मान्यवरांच्या हस्ते खाद्यजत्रेचे उदघाटन पार पडले.
खाद्यजत्रेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षक व पालक यांच्या सहाय्याने विविध प्रकारचे चविष्ट खाद्यपदार्थांची विक्री करून व्यवहार ज्ञान आत्मसात केले.विद्यार्थ्या खाद्य जत्रेला पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला होता.
दुपार सत्रात वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये विविध कला,क्रीडा सांस्कृतिक ,स्पर्धा परीक्षा विविध उपक्रमातील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव सोहळा संपन्न.
*विशेष मान्यवरांची उपस्थिती*
या कार्यक्रमाला व्यासपीठावर कणकवली पं.स.चे माजी सभापती दिलीप तळेकर, तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर, कासार्डे गावचे सरपंच सौ. निशा नकाशे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जाधव, माजी सरपंच सन्मा. शशांक तळेकर, चंद्रकांत तळेकर, प्रवीण वरुणकर, माजी उपसरपंच दिनेश मुद्रस, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शैलेश सुर्वे, विद्यमान ग्रा.प सदस्य संदीप घाडी, सौ. शर्वरी वायंगणकर, माजी ग्रा.प.सदस्य स उदय तळेकर, आदर्श व्यापारी संघटना अध्यक्ष दशरथ कल्याणकर, माजी अध्यक्ष अशोक तळेकर, माजी उपाध्यक्ष विश्वजीत तळेकर,ग्रामपंचायत अधिकारी सौ. राजलक्ष्मी जाधव, ग्राम महसूल अधिकारी प्रमोद कोळपकर, ग्राम तंटामुक्ती अध्यक्ष निलेश सोरप, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर, विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालयाचे प्राध्यापक हेमंत महाडिक, कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व पत्रकार दत्तात्रय मारकड, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ. अनुष्का गोसावी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ. वृषाली नर, शिक्षणप्रेमी सदस्य राजेंद्र पिसे, प्रशालेचे मुख्याध्यापक महेंद्र पावसकर इ. मान्यवर यांसह बहुसंख्य शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
*गरूडझेप हस्तलिखिताचे प्रकाशन..*
बक्षीस वितरण कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘गरुड झेप’ या विद्यार्थी लिखित हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक श्रीराम विभुते व शिक्षिका सौ. पाटील यांनी केले.तर शालेय वार्षिक अहवाल वाचन शिक्षिका सौ.स्नेहल जाधव यांनी केले.
सर्व कार्यक्रमाला विद्यार्थी,शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी प्रशालेचे मुख्याध्यापक महेंद्र पावसकर यांनी आभार मानले.
रात्रौ प्रशालेच्या बालवाडी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अतिशय बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.