*कोकण Express*
*खा. राऊत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा*
*शिवसेना नेते अतुल रावराणे*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वैभववाडी येथे शिवसेना नेते अतुल राव राणे यांची पत्रकार परिषद पार पडली. खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध उपक्रम राबविले जाणार आहे. त्याचबरोबर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना कोवीड लस घेण्यासाठी प्रोत्साहित करणार. आणि भैरीभवानी प्रतिष्ठान च्या तर्फे ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक गावातून ज्येष्ठ नागरिकांना हा उपक्रम भैरीभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून 40 दिवस राबविला जाणार आहे. त्याचबरोबर त्यांचा येण्या-जाण्याचा प्रवास खर्च व लसीकरण नोंदणी सह भैरीभवानी प्रतिष्ठान करणार आहे.
वारकऱ्यांचे व खासदार राऊत यांचे अतूट नाते असल्याने तालुक्यातील 100 वारकऱ्यांचे लसीकरण खासदार राऊत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात येणार. 15 मार्चला पंचायत समिती सभागृहात कोरोना महामारी च्या काळात महत्त्वाचे कामे करणाऱ्या अशा स्वयंसेविकांचा सन्मान करण्यात येणार.या कार्यक्रमाला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर उपस्थित राहणार. अशी माहिती शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी दिली. यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, माजी नगराध्यक्ष रवींद्र राव राणे, शहर प्रमुख प्रदीप रावराणे, रणजीत तावडे,संजय निकम, बंड्या होळकर, रोहित रावराणे, दीपक खांबाळे, उपसरपंच गणेश पवार ,कमलाकर सरवणकर, उपस्थित होते.