*कोकण Express*
*निगुडे रोणापाल हद्दीवर असलेली आंबा, काजू व नारळाची बाग शॉर्टसर्किटमुळे जळून खाक*
*बांदा ः प्रतिनिधी*
निगुडे रोणापाल हद्दीवर असलेली आंबा, काजू व नारळाची बाग शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु दुपारची वेळ असल्यामुळे प्रयत्न तोकडे पडले. सदर आग ही शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे बागायतदार प्रवीण चौकेकर यांनी सांगितले. आगीत सुमारे आठ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला. घटनास्थळी वीज वितरणचे अधिकारी दाखल झाले आहेत.