*कोंकण एक्सप्रेस*
*आम. श्री दीपक केसरकर काजू बोंडूवर प्रक्रिया व त्यापासून होणारी उत्पादने यावर अभ्यास करण्यासाठी ब्राझीलच्या दौऱ्यावर रवाना*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
काजू बागायतदार शेतकरी देखील तज्ज्ञ आहेत. त्यांच्यातील काही अनुभवी शेतकऱ्यांना सिंधू रत्न योजनेच्या ब्राझील दौऱ्यात समितीचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी नेले असते तर बरं झालं असतं असे बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी म्हटले आहे.
सिंधू रत्न समितीचे अध्यक्ष व सावंतवाडी मतदार संघाचे आमदार श्री दीपक केसरकर काजू बोंडूवर प्रक्रिया व त्यापासून होणारी उत्पादने यावर अभ्यास करण्यासाठी ब्राझीलच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. सिंधू रत्न योजनेतून सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक बळ वाढण्यासाठी दीपक भाईनी स्तुत्य असा कार्यक्रम राबविला आहे असे त्यांनी म्हटले आहे.