कोंकण एक्सप्रेस
आमदार दिपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा..
दोडामार्ग/शुभम गवस
आमदार दिपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. हा दिवस जेष्ठ मराठी कवी आणि साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.2013 साली महाराष्ट्र शासनाने त्यांच्या सन्मानार्थ 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केला. कुसुमाग्रज यांच्या साहित्यकार्याचा गौरव करण्यासाठी आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे मराठी भाषेच्या विकासात योगदान देणाऱ्या सर्व साहित्यिकांना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे.
आमदार दिपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभागामार्फत मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एन एम चौगुले सर होते. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले IQAC प्रमुख प्रा. ए बी ढेंगे सर यांनी विद्यार्थ्यांना कवी कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान व मराठी भाषेविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी डॉ. एस व्ही मोरे, ग्रंथालय विभाग प्रमुख बी .व्ही राशीवडे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस आर नाईक तर प्राध्यापक एम एस पाटील यांनी आभार मानले.