*कोंकण एक्सप्रेस*
*धामापुर चे सुपुत्र काँग्रेसचे माजी आमदार सुभाष चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन*
*मालवण ः प्रतिनिधी*
राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मालवण तालुक्यातील धामापुर येथील सुपुत्र माजी आमदार सुभाष चव्हाण यांचे आज मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली आहे.