*कोंकण एक्सप्रेस*
*सासोली-हेदुस येथे डंपरची धडक..*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
सासोली-हेदुस येथे एका डंपरने दुसऱ्या डंपरला
मागून धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात डंपर चालक गंभीर जखमी झाला आहे. कौस्तुभ नंदन मयेकर (वय २२, रा. कुडाळ) असे त्याचे नाव असून त्याचा हात आणि पाय फॅक्चर झाला असून त्याच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले.