*कोकण Express*
*पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा*
*सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी*
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक १५ मार्च २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
सोमवार दिनांक १५ मार्च २०२१ रोजी सकाळी १०.०० वा. हेलिकॉप्टरने एस.एच.केळकर विद्यालय हेलिपॅड,देवगड-जामसंडे येथे आगमन व मोटारीने शिरगांव ता. देवगड कडे प्रयाण,सकाळी १०.३० वा.शिरगांव,ता,देवगड,जलशुद्धीकरण केंद्र येथे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत टेंभवली व ९ गावे प्रादेशिक ग्रामिण पाणी पुरवठा योजना भूमिपूजन समारंभास उपस्थिती,सकाळी ११.३० वा.शिरगाव ता.देवगड येथून मोटारीने एस.एच.केळकर विद्यालय हेलिपॅड जामसंडे – देवगड कडे प्रयाण, सकाळी १२.०० वा.एस.एच.केळकर विद्यालय,हेलिपॅड जामसंडे-देवगड येथे आगमन व हेलिकॉप्टरने ओरोस-सिंधुदुर्गनगरीकडे प्रयाण, दुपारी १२.१५ वा.हेलिकॉप्टरने पोलीस परेड ग्राऊड,सिंधुदुर्गनगरी येथे आगमन व मोटारीने तळगाव,ता.मालवण कडे प्रयाण,दुपारी १२. ३० ला.तळगाव येथे खासदार विनायक राऊत यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, दुपारी १.३० वा.तळगाव येथून मोटारीने सिंधुदुर्गनगरीकडे प्रयाण,दुपारी २.०० वा.पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत सिंधुदुर्गनगरी बस स्टॅंड जवळ जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती,दुपारी २.३० वा.नवीन डिपीडीसी सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांचा आढावा बैठक,दुपारी ४.०० वा.जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद,दुपारी४.३० वा. सिंधुदुर्गनगरी येथून हेलिकॉप्टरने पाली,ता.रत्नागिरीकडे प्रयाण.