*कोंकण एक्सप्रेस*
*१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांची नंबरप्लेट बदलावी लागणार!*
या एच एस आर पी प्रणालीमध्ये युनिक आयडेंटीफिकेशन नंबर (युआयएन) आणि लेसर कोड यासारख्या वैशिष्ट्यांसह अशा नोंदणी प्लेट्स असतात की त्यात छेडछाड करून बदल करता येत नाही. यामुळे त्या वाहनांशी संबधित गुन्ह्यांचे परीक्षन आणि प्रतिबंध करण्यासाठी सहाय्यभूत ठरतात.
महाराष्ट्र राज्यातील ज्या वाहन मालकांनी १ एप्रिल २०१९ पूर्वी आपल्या वाहनांची नोंदणी केलेली आहे, त्यांनी आता या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. त्यांच्या वाहनांवर एच एस आर पी लावणे अनिवार्य आहे.