*कोंकण एक्सप्रेस*
*एस.एम.हायस्कूल केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेची शपथ देण्यात आली*
*कणकवलीत दहावी परीक्षा सुरळीत सुरू*
*कणकवली : प्रतिनिधी*
दहावीच्या परीक्षेला शुक्रवारी शांततेत प्रारंभ झाला. कणकवली शहरातील विद्यामंदिर हायस्कूल आणि एसएम हायस्कूल येथे विद्यार्थी व पालकांनी गर्दी केली होती. विद्यामंदिर हायस्कूल येथे 266 विद्यार्थी तर एसएमएस स्कूलच्या केंद्रावर 303 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. एस एम हायस्कूल येथे मुख्याध्यापक जी. एन. बोडके तर उपमुख्याध्यापक तथा केंद्र संचालक आर. एल. प्रधान व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेची शपथ दिली. तर विद्यामंदिर हायस्कूल येथे केंद्र संचालक तथा मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या.