*कोंकण एक्सप्रेस*
*कळसुलकर मध्ये शिवजयंती निमित्त शिवरायांसह रांगोळीतून मावळ्यांना मानाचा मुजरा*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी प्रशालेत शिवजयंती निमित्त शिवरायाच्या मूर्तीला आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शिवचरित्र व कार्यावर आधारित विद्यार्थ्यानी भाषणे, शिवगर्जना पोवाडा, वेशभूषा, कविता, नृत्य, नाटिका सादर केले. कु. चिन्मय कोटणीस यांने लेखन व दिग्दर्शन केलेले आगऱ्याहून सुटका अर्थात ‘गरुडझेप’ हे नाटक अधिक लक्षवेधी ठरले. यानिमित्ताने प्रशालेच्या सभागृहात 4 फूट बाय 35 फूट अशी भव्य आकाराची रांगोळी साकारण्यात आली. छत्रपतीचा मान हाच आमचा स्वाभिमान याच ब्रीदाशी एकनिष्ट राहत व आपल्या प्राणांची आहुती देणारे मावळ्याच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य प्रस्थापित केले आणि शिवप्रताप एक इतिहास झाला या संकल्पनेतून कलाशिक्षक श्री केदार टेमकर यांच्या सह विद्यार्थ्यानी शिवाजी महाराज व 14 मावळे यांची सुरेख भव्य अशी व्यक्तिचित्र रांगोळी साकारली. या रांगोळी साठी तब्बल 16 तासाचा कालावधी लागला. या सभागृहातील रांगोळीचे प्रदर्शन दिनांक 28 फेब्रुवारी पर्यंत खुले राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य श्री सूर्यकांत भुरे . सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद सांस्कृतिक विभागातील श्री. अनिल ठाकूर तसेच संस्था पदाधिकारी वर्ग, माजी विद्यार्थी व हितचिंतक, यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री प्रसाद कोरगांवकर यांनी केले.