*कोंकण एक्सप्रेस*
*ओरोस-वर्दे ते गावठाणवाडी पर्यंत बस सेवा पूर्ववत करा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांची मागणी*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
ओरोस वर्दे ते गावठणवाडी पर्यंत बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांनी केली आहे. सद्यस्थितीमध्ये सदर बस फेरी ही रमाई नगर येथून मागे फिरवली जाते त्यामुळे कोकेमळवाडी व गावठणवाडी येथील प्रवाशांची गैरसोय होत आहे. सदरची बस फेरी गावठणवाडी पर्यंत पूर्ववत केल्यास येथील प्रवाशांची होणारी पायपीट व आर्थिक भुर्दंड थांबणार आहे. तसेच गावठणवाडी मठ येथे गाडी वळवण्यासाठी जागा उपलब्ध आहे.
सदर परिस्थिती लक्षात घेऊन सहकार्य करण्याची विनंती सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांनी एस.टी आगारप्रमुख यांच्याकडे केली आहे . याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव उपस्थित होते.