*कोंकण एक्सप्रेस*
*बांदा निमजगावाडी येथे युवकाची गळफासाने आत्महत्या*
*बांदा : प्रतिनिधी*
निमजगावाडी येथील कैलास सखाराम सावंत (२७) या युवकाने रात्रीच्या सुमारास बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.सकाळी ही बाब नातेवाईकांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला आहे.त्याच्या पश्चात आई,वडील,भाऊ असा परिवार आहे.