कुडाळमध्ये 2 मार्चला इन्स्पायर सिंधुदूर्ग 2025 सायकलिंग स्पर्धा ;  25 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणीसाठी आवाहन

कुडाळमध्ये 2 मार्चला इन्स्पायर सिंधुदूर्ग 2025 सायकलिंग स्पर्धा ;  25 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणीसाठी आवाहन

*कोंकण एक्सप्रेस*

*कुडाळमध्ये 2 मार्चला इन्स्पायर सिंधुदूर्ग 2025 सायकलिंग स्पर्धा ;  25 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणीसाठी आवाहन*

*कुडाळ : प्रतिनिधी*

पेडल फाॅर हेल्थ पेडल फाॅर एनव्हायरमेंट या टॅगलाईनखाली सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन (CAS) व कुडाळ सायकल क्लब (KCC) यांचे संयुक्त विद्यमाने कुडाळ मध्ये 2 मार्च रोजी इन्स्पायर सिंधुदुर्ग 2025 सायकलिंग स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे सातवे वर्ष आहे. बॅ.नाथ पै शिक्षण संस्था मैदान एम आय डी सी कुडाळ येथे सकाळी ५.३० वाजता या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. ६० किलोमीटरची कोस्टल रोड रेस आणि २५ किमी ची फन राईड अअसे दोन प्रकार यामध्ये आहेत. कोस्टल राईड स्पर्धा पुरुष आणि महिला यांच्या एकूण चार गटात होणार असून त्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या दोन्ही प्रकारात जास्तीतजास्त सायकलपटूंनी सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन आणि कुडाळ सायकल असोसिएशनने घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले.

हाॅटेल स्पाईस कोकण येथे हि पत्रकार परिषद झाली. यावेळी कुडाळ सायकल क्लबचे अध्यक्ष रूपेश तेली ,इव्हेंट चेअरमन शिवप्रसाद राणे , डॅा.बापू परब,प्रथमेश सावंत, सचिन मदने ,प्रमोद भोगटे ,अमोल शिंदे ,डाॅ सिध्दांत परब ,डाॅ अमोघ चुबे आदी उपस्थित होते.

नवीन सायकलपटूंना प्रात्साहन देण्यासाठी २५ किमीची फन राईड खुल्या वयोगटात होणार असून नोंदणी शुल्क रू.400 आहे. त्याचा मार्ग कुडाळ एमआयडीसी ते वेंगुर्ला मठ तिठा आणि परत असा आहे. 60 किमीची कोस्टल राईड सायकल स्पर्धा महिला आणि पुरुषांसाठी दोन वयोगटात होणार आहे. १४ ते ४० वर्षे आणि ४० वर्षावरील मास्टर वयोगट असे दोन वयोगट आहेत.यासाठी रु. १२०० प्रवेश शुल्क आहे. या स्पर्धेसाठी पारितोषिके देखील ठेवण्यात आली आहेत. पुरूष खुला वयोगट 14 ते 40 साठी प्रथम रोख रू 21000 व चषक,द्वितीय रोख रू 15000 व चषक,तृतीय रोख रू 10000 ळ चषक, महिला खुला वयोगट (14 ते 40) प्रथम रोख रू 15000 व चषक,द्वितीय रोख रू 10000 व चषक,तृतीय रोख रू 7000 व चषक , मास्टर्स पुरूष गट वय 40 च्यावर प्रथम रोख रू 12000 व चषक,द्वितीय रोख रू 8000 व चषक,तृतीय रोख रू 5000 व चषक तर मास्टर्स महिला गट वय 40 च्यावर प्रथम रोख रू 10000 व चषक,द्वितीय रोख रू 5000 व चषक,तृतीय रोख रू 3000 व चषक अशी आकर्षक बक्षिसे असणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत देशभरातून सुमारे १५० नामांकित स्पर्धक त्यांच्या उच्च दर्जाच्या वेगवेगळ्या सायकली सह सहभागी होणार आहेत.

सर्व स्पर्धकांना हेल्मेट सक्तीचे आहे. स्पर्धेत सहभाग नोंदणीची मुदत 25 फेब्रुवारीपर्यंत असून प्रत्येक तालुक्यात विविध ठिकाणी नावनोंदणीचे अर्ज ठेवण्यात आले आहेत. मध्ये शिव एंटरप्रायझेस व इन्स्पायर सायकल कुडाळ, परब हाॅस्पिटल सुकळवाड,कनिष्क झेराॅक्स ओरोस, झांटये मेडिकल कट्टा, जनाई मेडिकल कणकवली, शहा सायकल स्टोअर्स सावंतवाडी, शिवदत्त सावंत वेंगुर्ला, रामचंद्र चव्हाण मालवण , संकेत नाईक दोडामार्ग, एम पी सायकल देवगड, जयदीप पडवळ शिरोडा, संतोष टक्के वैभववाडी या ठिकाणी नावनोंदणी अर्ज ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेस सहभागी सर्व स्पर्धकांना टी शर्ट दिले जाणार आहेत.

या भव्य सायकलिंग स्पर्धस भारतातील नामांकित सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. इच्छूक स्पर्धकांनी 25 फेब्रुवारी पर्यंत नावनोंदणी करावी असे आवाहन गजानन कांदळगावकर, रूपेश तेली शिवप्रसाद राणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!