*कोंकण एक्सप्रेस*
*नवीन कुर्ली फोंडाघाट येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी*
*नवदुर्गा युवा मंडळाकडुन आयोजन*
*फोंडाघाट : प्रतिनिधी*
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी नवदुर्गा युवा मंडळ (रजि.) कडुन भवानी मैदान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी पहाटे ०४:०० वाजता मंडळाचे पदाधिकारी रामगड येथे जावुन शिवज्योत घेवुन ०८:३० वाजता नवीन कुर्ली येथे आगमन झाले. सकाळी १०:०० वाजता मंडळाचे पदाधिकारी, सदस्य गावातील ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये छ. शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करुन पुजा, आरती करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकारांच्या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला. त्यानंतर दुपारी महाप्रसाद ,सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू, बुवा उदय पारकर यांचे सुस्वर भजन आणि रात्री छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत वेशभुषा, पोवाडा, नाटिका, रेकॉर्ड डान्स, वक्तृत्व स्पर्धा, असा विविध सांस्कृतिक सदाबहार कार्यक्रम आयोजन करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमावेळी मा. सभापती मनोज रावराणे यांनी कार्यक्रमास भेट देऊन महाराजांचे दर्शन घेतले व मंडळास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अशा विविध कार्यक्रमांनी मंडळाकडुन शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना मंडळाकडून प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देखिल देण्यात आली. यावेळी नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष अरुण पिळणकर, उपाध्यक्ष मंगेश मडवी, सचिव अतुल डऊर ,खजिनदार अमित दळवी,प्रशांत डाळवी, विजय आग्रे, राजेश हुंबे, सचिन साळसकर,अनिल दळवी, सचिन परब, रोहित चव्हाण, हर्षद चव्हाण, प्रसाद कोलते, सुरज शिंदे, अक्षय कोलते आदी तर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते,उपाध्यक्ष सुरज तावडे, सचिव धिरज हुंबे सर, बाळकृष्ण चव्हाण, अनंत चव्हाण, अशोक पिळणकर ,शिवाजी चव्हाण,कृष्णा पवार, शिवाजी तावडे, अंकुश दळवी, अरुण पवार, प्रकाश आग्रे ,गणेश साळसकर आदी ग्रामस्थ तर योगीता मडवी, अक्षरा डऊर, गीता हुंबे, आरती पिळणकर, हुंबे मॅडम, विनिता कोलते, स्वरा साळसकर आदी महिला उपस्थित होत्या.