*कोंकण एक्सप्रेस*
*तुये पेट्रोल पंप जवळ चार अपघात : डिचोली येथील राज पेडणेकर या युवकाचा जागीच मृत्यु*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
तुये पेट्रोल पंप जवळ आर्टिका जीए 11, टी 1672 आणि दुचाकी जीये थ्री, एके 6125 याच्यात समोरासमोर अपघात होऊन दुचाकी चालक कु.राज पेडणेकर ( वय 25 ) वर्षीय युवक जागीच ठार होण्याची घटना घडली.
आर्टिका जीए 11,टी 1672 हे वाहन त्या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंप वर पेट्रोल घालण्यासाठी टर्न मारत होते. पेट्रोल पंप बंद असल्यामुळे त्यांनी टर्न घेताना विरुद्ध दिशेने तुये मार्गे पेडणे दुचाकी वाहन जीए झिरो थ्री एके 6125 हे वाहन कु.राज पेडणेकर चालवत होते. समोरासमोर आणि दोन्ही वाहनाला काहीच कुणाचा अंदाज न आल्यामुळे जबरदस्त धक्का बसल्यामुळे दुचाकी स्वार कु.राज पेडणेकर हा जागीच ठार झाला.
कु.राज पेडणेकर हा युवक मूळ डिचोली ( गोवा ) चा रहिवासी असून सध्या तो शिवोली ( गोवा ) येथे वास्तव्याला होता. सुरुवातीला काही काळ त्याने गॅरेज चालवण्याचे काम केले होते. त्याच्या पश्चात आई आणि एक भाऊ असून सध्या तो बारावी मध्ये शिक्षण घेत आहे.
मांद्रे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तातडीने त्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. या अपघात प्रकरणी वाहन चालक श्री. सौरव गुडेकर ( रा. नेमळे – सावंतवाडी, सिंधुदुर्ग ) याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.