*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत कार्यानुभव हस्तकला वस्तूचे भव्य प्रदर्शन*
*कणकवली : प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थासाठी कार्यानुभव हा विषय शिकविला जातो श्री प्रसाद राणे सर या विषयाचे अध्यापन निष्णान्त असे कलेचे अध्यापक आहेत कार्यानुभव हा विषय फक्त कागदोपत्री गुणांसाठी न ठेवता तो विषय जगण्याचे साधन कसा बनेल यासाठी श्री राणे सरांनी विविध कलाकुसर अरुणाऱ्या वस्तूंचा शोध घेऊन नारळाच्या करवंटी पासून सौंदर्य कुशल वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले तसेच आपल्या घरातील निरूपयोगी वस्तूंचा पूर्नवापर करून नविन आयामांच्या कला कौशल्याचे रूप देवून आकर्षक वस्तू विद्यार्थ्यांनी तयार केल्या.
विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला म्हणजे विविध वस्तूंचे दालन तयार करणारी प्रशाला बनलेली आहे . कार्यानुभव विषयांतून विद्यार्थांच्या कल्पना शक्तीला व सर्जन शक्तीला चालना मिळते आणि अर्थाजन मिळविण्यासाठी एक शक्ती प्राप्त होते प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी या कला दालनांला भेट देवून विद्यार्थ्याचे कौतुक केले पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सरांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक करून अशा प्रदर्शनास प्रोत्साहन दिले . हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते.