विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत किल्ले बांधणीच्या रुपात अवतरली शिवशाही

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत किल्ले बांधणीच्या रुपात अवतरली शिवशाही

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत किल्ले बांधणीच्या रुपात अवतरली शिवशाही*

*कणकवली : प्रतिनिधी*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत छ .शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला प्रशालेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी किल्ले बांधण्याची तयारी सुरु केली आणि अक्षरशः प्रशालेच्या परिसरात दिवसभर कष्ट घेऊन इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिवछत्रपतीचे राज्य पुन्हा प्रशालेच्या परिसरात किल्ल्याच्या रूपात साकार केले रायगड प्रतापगड राजगड शिवनेरी सिंधुदुर्ग विजयदुर्ग जंजिरा तोरणा असे एकापेक्षा एक देखणे गडकिल्ले विद्यार्थांनी कल्पकतेने तयार करून शिवछत्रपतीच्या संपूर्ण जीवन कार्यांची आठवण करून दिली.

दगड मातींचा वापर करून सुंदर अशी सजावट करून किल्ले जिवंत करण्याचे कौशल्य विद्यार्थीच्या कला गुणांना वाव देणारे होते यासाठी कला शिक्षक श्री प्रसाद राणेसर शेळके जेजे सर शिरसाठ मॅडम यांनी विद्यार्थांना प्रोत्साहन दिले प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पीजे कांबळे सरांनी सर्व विद्यार्थांना इतिहासातील शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण करून देत ऐतिहासिक किल्ले हे राष्ट्राचे धन आहे त्यांचे जतन करावे असे आवाहन केले पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सरांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी किल्ल्यांची पहाणी करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!