*कोंकण एक्स्प्रेस*
*शिवजयंती निमित्त मांगेली-कुसगेवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य जयंती उत्सव बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी मांगेली-कुसगेवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
सकाळी सात वाजता शिवज्योत आगमन सडा किल्ला येथून सकाळी आठ वाजता महाराजांच्या मूर्तीचे पूजन व अभिषेक सकाळी साडेआठ वाजता भव्य रॅली संदीप गवस यांच्या घरापासून ते कासापर्यंत, साडेनऊ वाजता अल्पोपहार, सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रोळी सातेरी दिंडी पथक सावंतवाडा-दोडामार्ग व कुसगेवाडी वारकरी दिंडी साकव ते टेंबवाडी, दुपारी एक वाजता भोजनाचा कार्यक्रम, दुपारी तीन वाजता गणेश महिला फुगडी मंडळ साळ पुनर्वसन गोवा व मांगेली कुसगेवाडी महिला यांची फुगडी, संध्याकाळी साडेचार वाजता संगीत खुर्ची पुरुष व महिलांसाठी, संध्याकाळी पाच वाजता पैठणी खेळ महिलांसाठी, संध्याकाळी सात वाजता वेशभूषा स्पर्धा वयोगटनुसार, संध्याकाळी आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री साडेनऊ वाजता बक्षीस वितरण समारंभ, रात्री दहा वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी शिवप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री हनुमान कला क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ मांगेली कुसगेवाडी ग्रामस्थांनी केले आहे.