श्री संत गाडगेबाबा यांच्या नावाने सावंतवाडीत स्वच्छता मोहीम राबवा : मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर

श्री संत गाडगेबाबा यांच्या नावाने सावंतवाडीत स्वच्छता मोहीम राबवा : मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री संत गाडगेबाबा यांच्या नावाने सावंतवाडीत स्वच्छता मोहीम राबवा : मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

श्री संत गाडगेबाबा महाराज परिट समाज सिंधुदुर्ग जिल्हा व सावंतवाडी तालुका सेवा संघ यांच्या वतीने रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी श्री संत गाडगेबाबा जयंती सावंतवाडी येथे साजरी करण्यात येत आहे.

श्री. संत गाडगेबाबा महाराज हे स्वच्छतेचे पुरस्कर्ते होते, भजन, किर्तन या माध्यमातून त्यांनी स्वच्छताविषयक समाज सुधारणेचे व्रत स्विकारले होते. तसेच ते तरी या कार्यक्रमानिमित्त सावंतवाडी येथे साफसफाई करण्याचे योजले आहे. आपल्या सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत रविवार दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी मच्छीमार्केट व भाजी मार्केट या ठिकाणी, तसेच संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबवून सहकार्य करावे ही नम्र विनंती केली आहे.
शासनाच्या स्वच्छता अभियानांतर्गत सावंतवाडी नगरपरिषद शहरात सर्व प्रभागांमध्ये नेहमीच स्वच्छता मोहिम राबवित असते. या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य या संदर्भात जनजागृती करण्यात येते. या स्वच्छता मोहिमेत सर्व शाळा, हायस्कूल, कॉलेज, तसेच सामाजिक संस्था यांना सामावून घेण्याबाबत त्यांना पत्र देऊन कळविण्यात यावे ‌ अशा आशयाचे निवेदन जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर व तालुका अध्यक्ष राजू भालेकर यांनी सावंतवाडी मुख्याधिकारी यांना दिले आहे

यावेळी सौ. दिपाली दिलीप भालेकर, सौ. अनिता अमित होडावडेकर, सौ. अनुजा अनिल होडावडेकर, सौ शर्वरी शेखर होडावडेकर, सौ. सायली संजय होडावडेकर, देवयानी संतोष मडवळ, ‌‌संजय रामानंद होडावडेकर, प्रदीप चंद्रकांत भालेकर, भगवंत वसंत वाडकर, किरण जगनाथ वाडकर, स्वप्नील यशवंत कदम, दयानंद रामदास रेडकर, योगेश आरोलकर, रुपेश माणगांवकर ‌ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!