कॅथॉलीक पतसंस्थेला ‘कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार 2025 ‘ने सन्मानित !

कॅथॉलीक पतसंस्थेला ‘कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार 2025 ‘ने सन्मानित !

*कोंकण एक्सप्रेस*

*कॅथॉलीक पतसंस्थेला ‘कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार 2025 ‘ने सन्मानित !*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

कॅथॉलीक अर्बन, को- ऑप क्रेडिट सोसायटी लि. सावंतवाडी या पतसंस्थेस सहकार क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ‘कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार 2025’ देऊन आज अलिबाग येथे गौरवण्यात आले. अलिबाग येथे रविवारी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य निवडणूक प्राधिकरण आयुक्त अनिल कवडे, खासदार धैर्यशील पाटील, मिलिंदसेन भालेराव, आमदार निरंजन डावखरे, शैलेशजी कोतमिरे, प्रमोद जगताप, नंदकुमार चाळके, सुरेश पाटील या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार कॅथॉलीक अर्बनला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला देऊन गौरविण्यात आले.

अलिबाग येथे विभागीय सह निबंधक सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार सोहळा 2025 चे आयोजन करण्यात आले होते.

सातत्यपूर्ण प्रगती, सहकारातील योगदान आणि गुणवत्ता सिध्दता या निकषांचा विचार करुन ‘कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार’ हा मानाचा सन्मान कॅथॉलीक अर्बन पतसंस्थेला देण्यात आला. कोकण विभागातून या पुरस्कारासाठी अनेक अर्ज असून ही गेल्या अनेक वर्षात सहकार क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेऊन कॅथोलिक पतसंस्थेला हा पुरस्कार दिला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कॅथोलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन श्रीमती आनमारी डिसोझा, संचालक अगस्तिन फर्नांडिस, जनरल मॅनेजर जेम्स बोर्जीस, फ्रेंकी डॉन्टस, फातिमा कार्डोझ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मानचिन्ह, रोख रक्कम व भारतीय संविधानाची प्रतिकृती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी मागील काही महिन्यात बँको परस्काराने या पतसंस्थेला सन्मानित करण्यात आले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!