*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळात बॅंक युनियनची निदर्शने*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राष्ट्रीय बॅंकांमध्ये नोकर भरती करणे, पाच दिवसांचा आठवडा करणे यासह अन्य मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्यावतीने कुडाळ येथे निदर्शने केली.
युनियनचे पदाधिकारी निखिल साटम, राजरूप केळुस्कर, हृषिकेश गावडे यांच्यासह बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. बॅंक कर्मचारी व अधिकारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी 24 ते 25 मार्च या कालावधीत दोन दिवसीय देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात निदर्शने केली जात आहेत.