*कोकण Express*
*खारेपाटण केंद्र शाळेला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांची सदिच्छा भेट*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला सदिच्छा भेट दिली. व शाळेचे अभिनंदन केले.
शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी शिवसेना नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे शाळेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना कणकवली तालुका प्रमुख शैलेश भोगले, माजी सभापती संदेश पटेल, खारेपाटण – तळेरे शिवसेना विभाग प्रमुख महेश कोळसुलकर, उपविभागप्रमुख दया कुडतरकर, शिवसेना कार्यकर्ते प्रदीप इसवलकर, संतोष गाठे आदी मान्यवर उपस्थित होते.
कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नं.१ ही शाळा राज्यातील आदर्श शाळा तथा ’मॉडेल स्कुल’ म्हणून निवडण्यात आली असुन शाळेतील शिक्षकांचे, विद्यार्थी वर्गाचे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अभिनंदन करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी सतीश सावंत खारेपाटण येथे आले होते.