*कोकण Express*
*सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशन’ चे काम कौतुकास्पद…*
*या उपक्रमाला जिल्हा परिषद प्रशासनाचे विधायक सहकार्य राहील:मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर..*
*सिंधुदुर्गनगरी:*
जागरुकनागरिक आणि स्वयंसेवी संस्था स्वत:हून प्रशासनाच्या मदतीला येत असतील तर सर्वसमावेशक विकास अधिक वेगाने होऊ शकेल.‘सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशन’च्या माध्यमातून होत असलेले आरोग्यविषयक काम प्रशंसनीय असून या उपक्रमाला जिल्हा परिषद प्रशासनाचे विधायक सहकार्य राहील.‘मिशन’सोबत एप्रिलमध्ये बैठक घेऊन सविस्तर चर्चा करु, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासंदर्भात जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था व जागरुक नागरिकांनी स्थापन केलेल्या ‘सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशन’च्या शिष्टमंडळाने श्री. नायर यांची नुकतीच सदिच्छा भेट घेऊन त्यांना मिशनची माहिती दिली, त्यावेळी ते बोलत होते. या शिष्टमंडळात ‘आधार फाऊंडेशन’चे सचिव नंदन वेंगुर्लेकर, ‘घुंगुरकाठी’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, सामाजिक कार्यकर्ते विनायक मेस्त्री, निखिल सिद्धये उपस्थित होते. शिष्टमंडळाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन श्री. नायर यांचे स्वागत करण्यात आले.