घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यारंभ लवकरच – घनश्याम गांवकर

घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यारंभ लवकरच – घनश्याम गांवकर

*कोंकण एक्सप्रेस*

*घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यारंभ लवकरच – घनश्याम गांवकर*

*घाडीगांवकर समाज संस्था शतक महोत्सवी वर्ष सांगता समारोह संपन्न*

*कणकवली : प्रतिनिधी*

ज्या संख्येने घाडीगांवकर समाज शतक महोत्सवी कार्यक्रमात एकवटला आहे. तसाच घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यासाठी एक एकवटल्यास घाडीगांवकर समाज भवन कार्यारंभ लवकरच करता येईल आणि येत्या पाच वर्षात घाडीगांवकर समाज भवन उभे राहील ,असे प्रतिपादन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , मुंबई या संस्थेचे अध्यक्ष घनश्याम गांवकर यांनी केले. क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , मुंबई या संस्थेच्या शतक महोत्सवी वर्ष सांगता समारंभात मुंबई येथे ते बोलत होते.

१९२५ साली स्थापन झालेल्या क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज संस्थेच्या शतक महोत्सवी वर्ष सांगता कार्यक्रम नुकताच यशवंतराव चव्हाण नाट्यगृह , मुंबई येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला या सांगता कार्यक्रमाच्या निमित्ताने अशोक हांडे निर्मित मराठी बाणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज संस्थेची वागदे , तालुका कणकवली येथे ३० गुंठे जागा आहे . या जागेमध्ये बहुउपयोगी घाडीगांवकर समाज भवन प्रस्तावित आहे. या समाज भवन उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असून त्यासाठी घाडीगांवकर समाजातील घटकांनी जास्तीत जास्त आर्थिक हातभार लावायला हवा. असे आवाहन समाज संस्थेचे मध्यवर्ती कार्यकारणी सदस्य तथा पत्रकार विजय गांवकर यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.

शतक महोत्सवी सांगता कार्यक्रमात भाजपा मुंबई उपाध्यक्ष राजेश हाटले , शिवसेना उबाठाच्या उपनेत्या संजना घाडी , घाडीगांवकर सहकारी पतपेढीचे अध्यक्ष रघुवीर वायंगणकर, डोंबिवली विभाग अध्यक्ष आर.के. घाडीगांवकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमाला मुंबईचे माजी नगरसेवक संजय घाडी , मध्यवर्ती कार्यकारिणीचे उपाध्यक्ष लक्ष्मण घाडीगांवकर , सचिव गजानन घाडीगांवकर , खजिनदार सुहास गांवकर, रश्मी घाडीगांवकर , समाज संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारीणीचे सदस्य , सर्व विभागांचे अध्यक्ष , सचिव आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने घाडीगांवकर बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत घाडी यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!