*कोंकण एक्सप्रेस*
*देवगड उबाठा शिवसेना तालुकाप्रमुखपदी रवींद्र जोगल यांची नियुक्ती*
*देवगड : प्रतिनिधी*
देवगड उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे देवगड विभागाचे तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने देवगड विभागाच्या तालुकाप्रमुख पदी रवींद्र भाऊ जोगल यांची नियुक्ती जाहीर करण्यात अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आली.