*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग कॉलेज मालवणची विद्यार्थिनी तथा एनसीसी अंडर ऑफिसर*
*मालवण : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिल्यांदाच महिला खेळाडूतून दिल्ली येथील राष्ट्रीय पातळीपर्यंत नेमबाजी स्पर्धेसाठी जाणारी महिला खेळाडू म्हणून हर्षदाची पवार हिची निवड झाली आहे.
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या NCC राष्ट्रीय छात्र सेना विभागाअंतर्गत एनसीसी ट्रेनिंग घेत असलेली तसेच टी वाय बी ए या वर्गात शिक्षण घेत असणारी, एनसीसी अंडर ऑफिसर हर्षदा पवार हिची दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आज पर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला खेळाडू दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे. आतापर्यंत कोणीही नेमबाजी स्पर्धेत अर्थात रायफल फायरिंग कॉम्पिटिशन मध्ये एनसीसी कडून दिल्ली पर्यंत पोहोचलेली महिला खेळाडू नव्हती मात्र पहिल्यांदाच एनसीसी विभागातून महिला खेळाडू म्हणून अशा प्रकारची निवड झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3500 विद्यार्थी एनसीसी मध्ये एनसीसी कॅडेट प्रवेश घेतलेले आहेत. तसेच महाराष्ट्रात तीन लाख एनसीसी विद्यार्थी आहेत आणि देशभरात 15 लाख एनसीसी विद्यार्थी आहेत.
हर्षदा पवार ही आर्मी कडून फायरिंग कॉम्पिटिशन मध्ये सहभागी झालेले आहे. 58 महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग एनसीसी विभागाकडून ती सध्या खेळत आहे. गेली दोन वर्ष ती सतत आर्मी ऑफिसर कर्नल दीपक दयाल लेफ्टनंट प्राध्यापक डॉ एम आर खोत तसेच बटालियनचे सर्व आर्मी ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली फायरिंग कॉम्पिटिशन मध्ये सहभागी झालेली आहे. आतापर्यंत तिने दहा-दहा दिवसाचे 11 कॅम्प केलेले आहेत त्याचबरोबर एक एक महिन्याचे दोन कॅम्प केलेले आहेत. त्या प्रत्येक कॅम्पमध्ये ती विजयी झालेली आहे.