*कोंकण एक्सप्रेस*
*”त्या” चालकावर कारवाई करा : भाजपा शिष्टमंडळाची आगार व्यवस्थापक यांच्याकडे मागणी*
*एस टी बस बसस्टॉपवर उभी न करताच नेली पुढे : विद्यार्थ्यांचे हाल*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
सध्या १२ वीच्या परीक्षा सुरु आहेत, अशात वाहतूक व्यवस्था चोख ठेवावी यासाठीही खुप मेहनत घेतली जातं आहे मात्र काही वाहन चालकांच्या उद्धट पणाचा त्रास विद्यार्थ्यांना होतं आहे, अशीच घटना कळणे येथे घडली, दोन एस टी बसकळणे बस स्टॉपला उभ्या न केल्याने काही विद्यार्थ्यांची परीक्षा चुकता चुकता राहिली, यांनतर भाजपा शिष्ट मंडळाने आक्रमक होतं आगार प्रमुखांशी चर्चा केली व या चालकावर तात्काळ कारवाईची मागणी केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केर सावंतवाडी व पाळये सावंतवाडी या दोन एस टी बसच्या चालकांनी कळणे येथे बस स्टॉप वर उभ्या असलेल्या शाळकरी मुलींना बस नं थांबवता बस पुढे नेली. सध्या बारावीच्या परीक्षा चालू आहेत असे असताना बस थांबवली गेली नाही, त्यामुळे त्या विद्यार्थिनींची गैरसोय झाली, भाजपा पदाधिकारी याना ही घटना कळताच त्यांनी यांचा जाब विचारण्यासाठी दोडामार्ग बस स्थानक गाठले याठीकाणच्या वाहतूक नियंत्रकाना पत्र दिले व आगार प्रमुखांशी चर्चा करत तात्काळ या दोन्ही बसच्या चालकावर कारवाई करा अशी मागणी केली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, महिलाध्यक्ष सौ. दिक्षा महालकर, युवा मोर्चा अध्यक्ष पराशर सावंत, उपाध्यक्ष आनंद तळणकर, दिपक गवस, हसीना शेख, सरपंच अजित देसाई, योगेश देसाई, महेश लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.