महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहत आत्मनिर्भर बनावे ; समृद्धी पारकरमिळून साऱ्याजनी महिला मंचच्यावतीने महिला दिन साजरा ; विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार

महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहत आत्मनिर्भर बनावे ; समृद्धी पारकरमिळून साऱ्याजनी महिला मंचच्यावतीने महिला दिन साजरा ; विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार

*कोकण Express*

*महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहत आत्मनिर्भर बनावे ; समृद्धी पारकरमिळून साऱ्याजनी महिला मंचच्यावतीने महिला दिन साजरा ; विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढे जात आहेत.ही खरोखरच आपल्या महिलांसाठी अभिमानाची बाब असली तरी महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहत आत्मनिर्भर बनावे.जेव्हा एक स्त्री सक्षमपणे आपल्या कुटुंबाची जबादारी घेते त्याचवेळी ते कुटुंब समाजात ताट मानेने उभे राहते.जिजाऊ,सावित्रीबाई,लक्ष्मीबाई यांच्यासारख्या कर्तुत्वान महिलांचा वारसा आजच्या काळात ही महिलांनी सक्षमपणे चालवावा तेव्हाच महिलांचा खऱ्या अर्थाने विकास होईल असे प्रतिपादन त्यांनी केले.     मिळून साऱ्याजनी महिला मंच कणकवलीच्या वतीने आयोजित महिलादिनाच्या कार्यक्रमाचे उदघाटन माजी नगरसेविका समृद्धी पारकर यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी त्या बोलत होत्या.  आजचा ११० वा महिला दिन असून सातत्याने गेली २० वर्षे मिळून साऱ्याजणीच्या वतीने हा दिवस साजरा केला जात असून तालुक्यात कोरोना काळात सेवा देणाऱ्या डॉक्टर डॉ. मेघा पावसकर,विद्या शिर्के,मेघना घाडीगांवकर, ममता जाधव,सुप्रिया पाटील,दीपाली परब,उमा नाडकर्णी,चिन्मयी जाधव, पोलीस दलातील महिला,इतर सेवा मदत करणाऱ्या व न.प.च्या सफाई करणाऱ्या महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला.       प्रथमतः कोरोना काळात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एम.डी.आयुर्वेदामध्ये अग्निकर्म,विद्धकर्म यामध्ये स्पेशलायझेशन केलेल्या डॉ.अपूर्वा आनंद चिपळूणकर यांनी महिलांना होणाऱ्या आजारांवर मात कशी करावी,आहार कोणता घ्यावा याबाबत मार्गदर्शन करत महिलांच्या आरोग्यविषयक बाबीच्या अडचणी जाणून घेत उपचाराबद्दल माहिती दिली.याबद्दल त्याचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.     तद्नंतर दीक्षा पुरळकर,दीपा सरूडकर यांनी क्लासिकल डान्स  कान्हा सोजा जरा यावर नृत्य केले.तर श्वेता घाणेकर यांनी गाण्याचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.कोरोना बाबतचे नियम पाळून हा कार्यक्रम पार पाडला.मिळून साऱ्याजणी महिला मंचच्या अध्यक्षा सौ नीलम सावंत पालव, माजी नगरसेविका समृद्धी पारकर, शितल पारकर, तेजल लींग्रज, श्वेता घाणेकर,नगरसेविका सुमेधा अंधारी, सुमेधा काणेकर, अर्पिता सावंत ,अल्फा पारकर शीतल सावंत, रिया साटम ,नंदा साटम ,सुखदा गांधी, सुमन कदम माधुरी कोदे ,कांचन पालव राधिका पालव ,अंजू घवाळी ,प्रीती म्हापसेकर सुमेधा अंधारी, नीता मयेकर, स्मिता वालावलकर ,मंगल पाटकर ,दिशा पुरळकर, दीपा सरूडकर,शिल्पा सरूडकर,ज्योती मर्गज आदी महिला सहभागी झाल्या होत्या.यावेळी आम.वैभव नाईक,सेना नेते संदेश पारकर,नगरसेवक कन्हैया पारकर यांचे विशेष आभार मानले.     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आभार नीलम सावंत यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!