*कोंकण एक्सप्रेस*
*डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेत सावंतवाडीचा योगेश जोशी राज्यात प्रथम*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यातआलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या योगेश विवेकानंद जोशी या विद्यार्थ्याने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला असुन त्याची “व्हीवा” तोंडी परीक्षेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल त्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत, मुख्याध्यापक जगदीश धोंड आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.