*कोंकण एक्सप्रेस*
*शिकारीच्या उद्देशाने फिरताना मांगेली येथे दोघे ताब्यात*
*दोडामार्ग वनविभागाची कारवाई*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
मांगेली-कुसगेवाडी परिसरात शिकारीचा उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना दोडामार्ग वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काडतूसे बंदूक, शरें बॅटरी, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री १ वाजण्याच्या सुमारास मांगेली तिठा येथे करण्यात आली. रॉनी रोजी फर्नांडिस (वय ४७, रा. साटेली-भेटशी थोरले भरड) व गफूर मुसा शेख (वय ३३, रा. साटेली-भेटशी आवाड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर वन्यजीव अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोडामार्ग वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार रात्रौ १ वाजता मौजे मांगेली येथील कुसगेवाडी- देऊळवाडी तिटा रस्त्यालगलचे भागात विनापरवाना बंदुक घेवून शिकारीच्या उद्देशाने फिरत असताना रॉनी व गफूर या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांचेकडे असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली दोडामार्ग वनपरिक्षेत्र अधिकारी व्हि.एस. मंडल, वनपाल कोनाळ किशोर जंगले, वनरक्षक कोनाळ सुशांत कांबळे, वनरक्षक हेवाळे, अजित कोळेकर आदींच्या पथकाकडून करण्यात आली.